पाथर्डी प्रतिनिधी:-पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभुळगाव येथील महिला सरपंच ज्योती घोरपडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना राजकीय वादातून गावगुंडांकडून लोखंडी दांडक्यासह कुऱ्हाडीने जबर मारहाण करण्यात आली आहे.सध्या ते जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार घेत आहेत.हल्ला करणारे आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.या गावगुंडांमुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली असून या गावातील सर्वसामान्य नागरिक या गावगुंडांच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत.मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी वैजू बाबुळगावच्या ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे आज दि.२५ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आज सकाळी या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वैजू बाबुळगावच्या ग्रामस्थांनी करंजी येथे रास्ता रोको देखील केला.यावेळी मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे,वैजू बाबुळगाव उपसरपंच रावसाहेब लोहकरे,सुधाकर गुंजाळ,बबनराव गुंजाळ,बापु भवार,दिगंबर गुंजाळ,विठ्ठल दारकुंडे,मनेश घोरपडे,अप्पा वांढेकर,नामदेव नरवडे,प्रतिक घोरपडे,राजेंद्र गुंजाळ,सिंधु घोरपडे,मनिषा घोरपडे,छाया गुंजाळ,निर्मला गुंजाळ,अमोल फुलशेटे,नम्रता गुंजाळ,मिरा भवार,अशोक गुंजाळ,बापु घोरपडे,नामदेव मुटकुळे,प्रतीक घोरपडे,भारत घोरपडे,श्याम लोहकरे,अक्षय गुंजाळ,बाळासाहेब गुंजाळ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
