आष्टी वकील संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु अध्यक्ष पदासाठी दहा,उपाध्यक्ष पदासाठी पाच,सचिव पदासाठी तीन,कोषाध्यक्ष पदासाठी एक,महिला प्रतिनिधी साठी एक उमेदवारी अर्ज दाखल
आष्टी प्रतिनिधी/गोरख निकाळजे (दि.१४ ऑगस्ट):-सालाबाद प्रमाणे आष्टी वकील संघातील पदाकरिता या वर्षी निवडणूक जाहीर झाली आहे.दि.१४ ऑगस्ट २०२३ रोजी अर्ज भरण्यासाठी अंतिम दिवस असल्याने आज पर्यंत अध्यक्ष पदासाठी पुढील उमेदवाराने अर्ज दाखल केले आहेत.ऍड. एन.एस.विधाते,ऍड. विजयकुमार ढोबळे,ऍड. राकेश हंबर्डे,ऍड.संभाजी दहातोंडे,ऍड.हनुमंत शिंदे,ऍड. संग्राम गळगटे,ऍड. बाळासाहेब झांबरे,ऍड.बाप्पू गर्जे,ऍड.इरफान शेख,ऍड. श्रीकृष्णा देशपांडे,तसेच उपाध्यक्ष पदासाठी ऍड.संदीप जगताप,ऍड.डी.सी.शेख,ऍड. प्रशांत पवार,ऍड.किशोर निकाळजे,ऍड.इरफान शेख, तसेच सचिव पदासाठी ऍड.संग्राम गळगटे,ऍड. महादेव मोहिते,ऍड.बाप्पू गर्जे, तसेच कोषाध्यक्ष पदासाठी ऍड.सुनील जाधव तर महिला प्रतिनिधी साठी ऍड.पुष्पा भगत यांचे अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवाराच्या अर्जाची छाननी दि.१६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२३ रोजी आहे.त्याच दिवशी उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत मतदान होणार आहे.मतदान संपल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येईल.अशी माहीती आष्टी वकील संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍड.आदिनाथ पोकळे,ऍड. डी.एस.ससाणे यांनी दिली.