मुस्लिम समाजाच्या धार्मिक ग्रंथाची विटंबना केलेल्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी गौसे आजम सेवाभावी संस्थेची निवेदनाद्वारे मागणी
श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१४ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावातील काही समाजकंटकांनी मशिदीत जाऊन मुस्लिम समाजाच्या धार्मिक ग्रंथाची पाने फाडून जागोजागी इतरत्र फेकून विटंबना केली.त्यामुळे मुस्लिम बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे समाजात व राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.अशा समाज कंठकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीची निवेदन गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.