Maharashtra247

पांजरापोळ जवळ भीषण अपघात दाेन ठार तर तीन जखमी 

 

अहमदनगर (दि.१४ ऑगस्ट):-नगर शहरालगत एका ठिकाणी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने कार ही अतिवेगात असल्याने सुरुवातीस डिव्हायडरला धडकली नंतर दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली.ही घटना नगर-दाैंड रस्त्यावर कायनेटिक चौकाच्या पुढे पांजरपाेळ संस्थेजवळ घडली.यात दाेन जण जागीच ठार झाले आहेत.तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.साहिल सादिक शेख रा.बुरडगाव रोड,संतोष मोरे,रा.चिपाडे मळा अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की यातील दोघे हे जागीच ठार झाले.घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल होऊन पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेले.

You cannot copy content of this page