मोक्का व खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या
अहमदनगर (दि.१४ ऑगस्ट):-मोक्का व खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.बातमीची हकिगत अशी की,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 299/2023 आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे दि. 25/03/23 रोजी दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे 1) सलीम ऊर्फ पाप्या खॉजा शेख हा साक्षीदारांना जामिन व इतर खर्चासाठी जेल मधुन फोन करुन तसेच त्यांचे हस्तका मार्फत फोनव्दारे पैशाची मागणी करत असे व पैसे दिले नाही तर तुला पाहुण घेतो असे म्हणुन खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने तपासा अंती सदर गुन्ह्यास भादविक 384,385,120 (ब),34 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कलम (मोक्का) 3 (1) (I) (II), 3 (2), 3 (4) प्रमाणे वाढीव कलमांचा अंर्तभाव करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 2) तनवीर मोहमद हानिफ रंगरेज रा.कोपरगांव हा गुन्ह्यात निष्पन्न झाल्यापासुन फरार होता.कोपरगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करुन फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी तनवीर रंगरेज हा टाकळी फाटा,ता.कोपरगाव येथे येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.पथक टाकळी फाटा परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम येताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले.पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) तनवीर हनिफ रंगरेज रा.सुभाषनगर,ता. कोपरगाव असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोस्टे येथे हजर केले आहे.पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोस्टे करीत आहे.आरोपी नामे तनवीर हनिफ रंगरेज हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द पुणे व अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न,गंभीर दुखापत इतर कलमान्वये एकुण-5 गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व डॉ.श्री.बसवराज शिवपुजे उविपोअ श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ/रविंद्र पांडे,सुरेश माळी,पोना/रविंद्र कर्डीले,पोकॉ/सागर ससाणे,रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.