अहमदनगर (दि.१४ ऑगस्ट):-‘सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या सुरक्षिततेसाठी’..या कोतवाली पोलिसांच्या संकल्पनेला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत वर्गणी गोळा करून तापीदास गल्ली,आडते बाजारात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार केला आहे.कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत तापीदास गल्ली येथे मागील काही दिवसांत किरकोळ वादाच्या घटना घडल्यानंतर या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला होता.परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक बोलावून सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी ही संकल्पना पोलीस निरीक्षक यादव यांनी त्यांच्या समोर मांडली होती.व्यापारी वर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही अनुचित घटना किंवा चोरीची घटना घडल्यास आरोपींना शोधण्यासाठी सीसीटीव्हीची कशी मदत होते,याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी व्यापाऱ्यांना दिली होती.या संकल्पनेला प्रतिसाद देत सर्व व्यापारी वर्गाने एकत्रित बैठक घेवुन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा त्यांनी एकमताने निर्णय घेतला.सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रत्येकी २ हजार रुपये वर्गणी करुन कॅमेरे बसविल्याने परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा कवच तयार झाले आहे.कोतवाली पोलिसांनी व्यापाऱ्यांचा केला सत्कार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परिसराला भेट देऊन बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार केला.यावेळी महेंद्र वर्मा,जयदिप तिवारी,नितीन भंडारी,चिंतामणी वैजनाथ, अमित काबरा,सागर काबरा, अतिश कर्नावट,गणेश डांगरे, सागर ट्रेडर्स,दिपक कळसकर,वसंत मुनोत,संदिप लोढा,दिलीप देडगावकर,कमलेश भंडारी, उध्दव शर्मा,मोहक जामगावकर,उमेश तिवारी, शुभम लड्डा,योगेश जाजु, अमित मुथ्था,प्रशांत मुथ्था, विजय गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेंद्र गर्गे,योगेश खामकर,मच्छिंद्र पांढरकर आदी उपस्थित होते.
