अहमदनगर (दि.१५ ऑगस्ट):-नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमा साठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र सानप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीत व नृत्य सादर केले.तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्र सानप यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगुन हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना देशसेवा करण्याचे आवाहन केले.यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार राजेंद्र सुद्रिक,किशोर जाधव उपस्थित होते.तसेच यापूर्वी शाळेत झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण ही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात तीनही सेना दलातील पंधरा माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.अशोक पाटोळे सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन संदेश खरात सर यांनी केले तर नीता बोरुडे मॅडम यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक बेरड सर यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
