संगमनेर प्रतिनिधी/राजेंद्र मेढे (दि.१५ ऑगस्ट):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे ग्रामपंचायत कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण महोत्सव सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच श्री. विलास (अण्णा) सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व देशसेवा करण्याचे आवाहन केले.तसेच गावातील विजयस्तंभाला अभिवादन करून तेथील ध्वज नाईक सुभेदार सुधाकर भाऊसाहेब गोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.त्याच प्रमाणे श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातही स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला येथील ध्वजारोहण श्री. हौशीराम रामराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी गावातील सर्व गावकरी तसेच शाळेतील विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

