अहमदनगर (१५ ऑगस्ट):-१५ ऑगस्टच्या दिवशी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला आहे त्याच दिवशी भारताचे तुकडे करण्याची भाषा व घोषणा काही तरुणांनी केली आहे.अशा घोषणा दिल्यामुळे त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी या तरुणांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलिसांच्या हवाली केले.याप्रकरणी जवानांकडून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीमध्ये भारत देशाबद्दल आक्षेपार्य विधान करून भारताचे तुकडे होतील अशा घोषणा देण्यात आल्या होत्या या तक्रारीवरून सार्वजनिक एकोप्याला बाधा होईल त्यामुळे भिंगार कॅम्प येथे भादवी.153 (अ) 134 प्रमाणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यामधील तीन जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना नोटीस देऊन पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.
