अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-गणपती बाप्पाचे आगमन आता महिना भरातच हाेणार आहे.त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना पाेलीस व महापालिका प्रशासनाकडून विविध स्वरूपाच्या परवानग्या देण्यात येतात.पोलीस व मनपाकडून १ सप्टेंबर पासून परवानगीची प्रक्रिया सुरू होणार आहे.सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी महापालिका एक खिडकी याेजना सुरू करणार आहे.नगर शहरात माेठ्या प्रमाणावर गणेशाेत्सव साजरा केला जाताे.त्यासाठी सार्वजनिक मंडळांकडून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.यंदा १९ सप्टेंबर राेजी गणपतीचे आगमन हाेणार आहे.घराेघरीही गणेशाचे माेठ्या उत्साहात स्वागत केले जाते.सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप,मिरवणुका आदींसाठी पाेलीस, महापालिका,अग्निशमन विभागाची परवानगी घ्यावी लागते.यासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी महापालिकेकडून एक खिडकी याेजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
