Maharashtra247

भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कामगिरी

 

अहमदनगर (दि.२५ ऑगस्ट):-भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.विक्रम संजय वाणे (वय ३० वर्षे रा. प्रशांत सोसायटी कल्याणरोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. विक्रम वाणे हा त्याच्या कल्याण रोडवरील राहत्या घरी आला असता कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली.

कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर १३ ऑगस्ट २०२३ रोजी गु.र.नं.। ९२८/२०२३ भा.द.वि. कलम ३७६,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. विक्रम संजय वाणे याने पीडित महिलेला स्वभावाचा फायदा घेऊन भाड्याने घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेले होते. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बळजबरी अत्याचार केला होता. तसेच शारीरिक संबंध ठेवल्या बाबत कोणाला काही सांगितल्यास पीडितेला व तिच्या नवऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना कोतवाली पोलिसांना आरोपी त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या पथकाने आरोपी विक्रम वाणे याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोसई प्रविण पाटील, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात,अमोल गाढे,कैलास शिरसाठ, याकुब सय्यद, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page