पारनेर प्रतिनिधी (दि.३० ऑगस्ट):-ऑगस्ट महिना संपला तरी समाधान कारक पाऊस झाला नसल्याने शेतातील पिकानी मान टाकली आहे. पावसा अभावी उभी पिक जळून जात आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आतुरतेने पाऊसाची प्रतीक्षा करत आहे.रोज वातावरणात बदल होत असून आज तरी थोडा फार प्रमाणात पाऊस येईल आणि शेतातील पिकांना जीवदान भेटल अशी आशा ठेवून शेतकरी आहेत.
गोरेगाव परिसरातील तरुण युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतशील शेती करण्याकडे पाहत आहेत.गोरेगाव साठी वरदान असणारे पाझर तलाव या पूर्वीच आटले आहे.त्यात यावर्षी पाण्याचा पाऊस पण झाला नाही.विहिरी,बोअरवेल यांची पाणी पातळी ही खलावली आहे.शेतकऱ्यांनी जेमतेम झालेल्या पाऊसावर मूग,बाजरी,सोयाबीन,तुर, वटाणा,कांदा,मिरची आदी पिकाची लागवड केली पण वरुणराजाने ऐनवेळी दांडी मारल्याने शेतातील उभे पिके पाण्या अभावी करपत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
ऑगस्ट महिना संपला तरी देखील पाऊस नसल्याने शेतातील पिके करपली आहेत.पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविमा तातडीने द्यावा अशी मागणी प्रगतशील शेतकरी गणेश तांबे,सबजी शेरकर,विकास काकडे,साहेबराव नरसाळे, धनंजय नागरे,प्रवीण नरसाळे, संदीप तांबे,संतोष नरसाळे,आदी शेतकऱ्याकडून होत आहे.यावेळी गोरेगावच्या सरपंच सौ.सुमनताई बाबासाहेब तांबे म्हणाल्या की
पावसा अभावी पिके करपल्याने शेतकऱ्याचे हातात आलेले पिके गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.लवकरात लवकर पीकविमा पंचनामे सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
