
अहमदनगर (दि.११ सप्टेंबर):- पर्युषण महापर्वानिमित्त अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने तसेच सर्व प्रकारचे मांसविक्री दुकाने १२ आणि १९ सप्टेंबर २०२३ या दोन दिवशी बंद ठेवण्याचे महापालिच्या वतीने आदेश जारी केले आहे.
यासाठी यश प्रमोद शहा वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया तथा अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख यांनी जैन समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासन निर्णय ऑर्डर,जिल्हा प्रशासन आदेश कॉपी तथा अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे सर्वोच्च न्यायालय आदेश अपील पत्र निर्णयाला अनुसरून परिपत्रक सोबत जोडून याबाबत ई-मेल पाठवला होता.मनपा आयुक्त तथा आरोग्य अधिकारी यांच्याशी फोनवर तथा ईमेलद्वारे विनंती केली होती.यश शहा यांचा ई-मेल महाराष्ट्र शासन आदेश तथा जिल्हा प्रशासन आदेशाच्या अनुषंगाने अहमदनगर महापालिका प्रशासनाने हा आदेश पालिका हद्दीतील सर्व क्षेत्रासाठी पारित केलेला आहे. अॅनिमल सदस्य पालिका हद्दीतील सर्व क्षेत्रासाठी पारित केलेला आहे.
या आदेशाची प्रत आरोग्य विभागाने आयुक्त महानगरपालिका नगर,उपायुक्त घनकचरा विभाग प्रमुख,सर्व प्रभाग सर्व स्वच्छता निरीक्षक,अधिकारी,प्रसिद्धी विभाग या सर्वांना उचित कार्यवाही तसेच कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे.शहा यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात अशी विनंती आयुक्त,आरोग्य अधिकारी,सर्व पोलीस स्टेशन प्रमुख यांना तसेच पोलीस उपाधीक्षक यांना फोन द्वारे तथा ईमेल द्वारे केलेली आहे.यश शहा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निर्णयाला अनुसरून परिपत्रक सोबत शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जोडून याबाबत ई-मेल मुख्यमंत्री कार्यालय तथा पशुसंवर्धन तसेच गृहमंत्रालय यांना संबंधित सर्व विभागांना यांची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना करावी ही विनंती ईमेलद्वारे केलेली होती.अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील बंदीचे आदेश तात्काळ काढले आहे.