
अहमदनगर (दि.१४ सप्टेंबर):-एसटीबस ड्रायव्हरला मारहाण प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन आरोपींना केले शिताफीने जेरबंद,
बातमीची हकीकत अशी की,दि.११ सप्टेंबर रोजी यातील फिर्यादी सोपान विठ्ठल पवार एस.टी.बस ड्रायव्हर (रा.बांगी ता.श्रीरामपुर जि. अहमदनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की मला दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० वा. चे सुमारास श्रीरामपुर ते पुणे एसटीबस नं.एमएच १४ बी.टी.४१६९ हीने प्रवासी घेवून अहमदनगर येथुन डी.एस.पी.चौक ते माळीवाडा बसस्थानक कडे जात असतांना नटराज हॉटेलच्या समोर एक सुझुकी मोपेड मोटारसायकल वरील १) मुजिब उर्फ भुन्या अजिज खान रा मुल्ला कॉलनी,मुकुंदनगर २)आरीफ जाबीर खान रा.दगडी चाळ. मुकुंदनगर यांनी एस.टी.बस ड्रायव्हरने हॉर्न का वाजवला या कारणावरून एस.टी.बस ला सुझुकी मोपेड गाडी आडवी लावुन एस.टी.बस मध्ये घुसुन एस.टी.बस ड्रायव्हरला शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला.
त्यावरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुरनं 591/2023 भादविक 353, 341,332,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करतांना सपोनि/ दिनकर मुंडे यांना गोपनीय माहिती मिळाली की.सदर चा गुन्हा १) मुजिब उर्फ भुन्या अजिज खान २)आरीफ जाबीर खान यांनी केला असुन ते मुकुंदनगर भागात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सपोनि/दिनकर मुंडे यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन मुकुंदनगर भागात पाठविले. सदर पथकाने सापळा रचुन दोन्ही आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले आहे.सदरची कार्यवाही श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभा.पो.अधि.शहर भाग यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी.दिनकर एस.मुंडे,पोसई/किरण साळुंके,सफो/कैलास सोनार, पोहेकॉ/रेवननाथ दहिफळे, पोहेकॉ/संदिप घोडके, पोहेकॉ/रामनाथ डोळे,पोना/ दिपक शिंदे,पोकॉ/अमोल आव्हाड यांनी केली आहे.