
अहमदनगर (दि.१४ सप्टेंबर):-कामरगाव येथील ज्येष्ठ नागरिक श्री. छगन धोंडीबा ढवळे (वय 70 वर्ष रा. कामरगाव) हे त्यांच्या कामानिमित्त नगर शहरात आले असताना गाडीतून उतरताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून 30,500/- रू. पडून गहाळ झाले होते.
याबाबत ते माहिती देण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे आले असता तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मधुकर साळवे व सपोनि.श्री.नितीन रणदिवे यांनी गुन्हे शोध पथकातील पथकातील पोलीस अंमलदार संदीप गिऱ्हे यांना ढवळे यांचे पैशाबाबत तपास करण्याचे आदेश दिले असता संदीप गिऱ्हे यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून अर्ध्या तासाच्या आत ढवळे यांचे पैसे हस्तगत करून ते ढवळे यांच्या ताब्यात दिले.
अर्ध्या तासात हरवलेले पैसे पुन्हा मिळाल्याने श्री.ढवळे यांनी तोफखाना पोलिसांच्या कामाचे कौतुक करून आभार मानले.