
अहमदनगर (दि.१४ सप्टेंबर):-हार्मनी इंटरनॅशनल स्कूलचे ज्येष्ठ हिंदी शिक्षक श्री.अशोक पाटोळे व हिंदी शिक्षक सौ.शीला बडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत हिंदी दिन साजरा करण्यात आला.
अशोक पाटोळे सर यांनी यावेळी प्रस्ताविक केले.इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी रिया जाधव हिने मंचाचे संचालन केले तर इयत्ता 3 री ते 9 वी मधील विद्यार्थ्यांनी हिंदीचे महत्व सांगणारी भाषणे दिली.सोबतच काही विद्यार्थ्यांनी हिंदी कविता वाचून आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ.शीला बडेकर मॅडम यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून हिंदी भाषेचे लोककल्याणकारी स्वरूप मुलांसमोर समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी हार्मनी स्कूलचे प्राचार्य श्री.अशोक बेरड सरांनी मुलांना दैनंदिन जीवनात हिंदीचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.आणि या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण शाळेतील मुलांनी फक्त हिंदी भाषेचे कौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माँन्ट विभागाच्या शिक्षिका सौ.एलिझाबेथ मॅडम,वृषाली मॅडम, भावीषा मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.