
अहमदनगर (दि.२१ सप्टेंबर):-हॉटेल मधील कामगारांवर दहशत करुन गंभीर दुखापत करणाऱ्या टोळीस भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दि.13 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास हॉटेल प्रकाश येथे जेवण करण्यासाठी आलेला सचिन शिंदे व त्याच्या सोबतचे ७ अनोळखी इसम यांच्यात जेवण करीत असताना आपसात मोठमोठ्याने आरडाओरड करुन भांडणे चालू होती.
त्यावेळी हॉटेल मधील कामगार हे सचिन शिंदे व अनोळखी सात इसमांना भांडण करु नका असे सांगत असताना यातील आरोपी सचिन शिंदे यांने हॉटेल मधील वेटर याच्या डोक्यात सोडा वॉटरची बाटली मारुन गंभीर दुखापत केली व इतर अनोळखी सात इसमानी हॉटेल मधील इतर कामगारांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली त्यावरुन हॉटेल प्रकाशचे मॅनेजर सुनिल संभाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोस्टे येथे गुरनं 596/2023 भादवि कलम 326, 324, 323,504, 506,143,147,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करताना सपोनी/दिनकर मुंडे यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदर चा गुन्हा हा 1) राहुल साहेबराव शिंदे रा. साई नगर,माधवबाग,भिगांर 2) आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे,नागरदेवळे 3) निखील अश्विन घोरपडे रा. भुमेश्वर कॉलनी,भिंगांर 4) राहुल अनिल शिंदे रा.श्रीराम कॉलनी,भिंगांर 5) राहुल उत्तम काळे रा.महेश नगर, भिंगार यांनी केला असून ते वडारवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि/मुंडे यांनी भिगांर कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकाला याची माहिती देऊन तात्काळ वडारवाडी,भिंगार भागात पाठवले.
तपास पथकाने सापळा रचून पाच जणांच्या टोळीला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे,कैलास सोनार,गोविंद गोल्हार,संदीप घोडके,रेवननाथ दहीफळे,दिपक शिंदे,अमोल आव्हाड यांनी केली आहे.