
अहमदनगर (दि.२१ सप्टेंबर):-नगर शहरातील गुलमोहर रोडवरील पारिजात चौक परिसरात विकत घेतलेल्या एका घरावर चोर सोडून संन्यासाला फाशी असाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे.
या प्रकरणातील गंगाराम हिरानंदानी यांनी 8 मे 2023 रोजी शरदचंद्र विठ्ठलराव गुंजाळ यांच्या स्वमालकीचे गुलमोहर रोड वरील घर सर्व कायदेशीर बाबी परिपूर्ण करून विकत घेतले होते. त्यावेळी या व्यवहारामध्ये ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित नसून आपल्या कष्टाने आणि स्वमालिकेचे असल्याचे या जमिनीचे मालक शरदचंद्र गुंजाळ यांनी हिरानंदानी यांना सांगितले होते.त्या वेळी कायदेशीर नोटीस ही प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर उपनिबंधक कार्यालयात रीतसर कायदेशीर खरेदी करण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात जेव्हा गंगाराम हिरानंदानी विकत घेतलेल्या आपल्या जागेवर गेले असता त्या ठिकाणी शरदचंद्र गुंजाळ यांचे मोठे बंधू चंद्रशेखर गुंजाळ यांचा मुलगा बंटी गुंजाळ आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी राहत असल्याचं लक्षात आल्यानंतर ही प्रॉपर्टी मी विकत घेतली असून त्यामुळे आपण ती खाली करावी अशी विनंती गंगाराम हिरानंदानी यांनी चंद्रशेखर गुंजाळ यांना केली मात्र एक दोन वेळा समजावून सांगूनही घर खाली होत नसल्याने अखेर आपले घर ताब्यात घेण्यासाठी गंगाराम हिरानंदानी 19 सप्टेंबर रोजी गेले असताना चंद्रशेखर गुंजाळ बंटी गुंजाळ आणि त्यांच्या पत्नीने गंगाराम हिरानंदानी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या काही कामगारांवर दगडफेक सुरू केली यावेळी गंगाराम हिरानंदानी त्या ठिकाणाहून निघून गेले मात्र बचाव करत असताना हिरानंदानी यांचे कामगार आणि गुंजाळ यांची झटापट झाली मात्र या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुंजाळ कुटुंबीयांनी खोटी फिर्याद देऊन गंगाराम हिरानंदानी यांच्याबरोबर खोटे आरोप करत हिरानंदानी आपल्या घरावर ताबा मारत असल्याचे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी गुंजाळ यांच्या फिर्यादी नुसार गंगाराम हिरानंदनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान दि.21 सप्टेंबर रोजी हिरानंदानी यांनी विकत घेतलेले घर मिळावे व या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल झाले आहे ते मागे घेण्यात येऊन न्याय मिळावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.