
अहमदनगर (दि.२१ सप्टेंबर):-मोबाईल चांगला तेवढाच वाइट त्याचाच एक प्रत्यय शहरात आला असून इंस्टाग्राम वर ओळख निर्माण करून सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलीसांनी केले अवघ्या बारा तासाचे आत जेरबंद,बातमीची हकीकत अशीकी,एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्ट्राग्रामवर ओळख करुन तीला कॉलेजच्या बाहेर बोलावुन फुस लावुन तीच्यावर अत्याचार केला.याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन इसम नामे सोमनाथ देवीदास तांबोरे (रा.भायगाव ता.शेवगाव जिल्हा अहमदनगर) याच्यावर तोफखाना पोस्टे गु.र.नं 1415/2023 भा.द.वि. कलम 376 (अ), 376(2) )N) 506 सह बालकांचे लैगींग अत्याचारापासुन सरक्षण कायदा 2012 चे कलम 4,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तोफखाना पोलिसांनी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे चक्रे फिरवत आरोपीला बारा तासाच्या आत शिताफीने ताब्यात घेतले.पुढील तपास पो.उप.निरी.सचिन रणशेवरे हे करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे,तोफखाना पो.नि.श्री.मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/नितीन रणदिवे, पो.उपनिरी/सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोना/ पोना/संदिप धामणे,अविनाश वाकचौरे,सुरज वाबळे,संदिप गि-हे,गौतम सातपुते,सतीष त्रिभुवन,सतीष भवर,सायबर सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.