
अहमदनगर (दि.२२ सप्टेंबर):-एक वर्षापासून फरार असलेल्या लैगिंक अत्याचार गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे.
बातमीची हकीकत अशी की,दि.30/09/2022 रोजी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गौरव राजेश कनोजिया (रा.मंगलगेट हवेली,बाराइमाम हवेली जवळ,मंगलगेट,अहमदनगर, हल्ली रा.झेंडीगेट, अहमदनगर) याचे विरुध्द भिंगार कॅम्प पोस्टे येथे गुरनं 441/2022 भादवि कलम 376 (2), (N), 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी फरार झाला होता.या गुन्ह्याचा तपास करताना सपोनी/ दिनकर मुंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्ह्यातील आरोपी हा मंगलगेट परिसरात आला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सपोनि/मुंडे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे तपास पथक मंगलगेट परिसरात शोध घेणेकामी रवाना केले.तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरात शोध घेतला असला गुन्ह्यातील आरोपी हा मगंलगेट परिसरात वेष बदलून वावरत असताना दिसून आला सदर आरोपी पोलीस आल्याचे पाहताच त्याने तेथून पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन अटक केली.या आरोपीस मा.न्यायालयाने आरोपीस 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री/दिनकर मुंडे,पोसई/मनोज महाजन,सफो/कैलास सोनार,पोहेकॉ/संदीप घोडके,पोहेकॉ/दहीफळे,पोना/दिलीप शिंदे,पोकॉ/अमोल आव्हाड यांनी केली आहे.