भिस्तबाग चौकातील गोरक्षनाथ तरुण मंडळाच्या स्वामी समर्थ प्रकटदिन देखाव्याचे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन;नगरकरांना सलग सात दिवस देखावा मिळणार पहायला
अहमदनगर (दि.२२ सप्टेंबर):-नगर शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात गोरक्षनाथ तरुण मंडळाने यावर्षी स्वामी समर्थ प्रकटदिन हा आकर्षक असा देखावा नगरकरांसाठी तिसऱ्या दिवसापासूनच पाहण्यासाठी खुला केला आहे.या देखाव्याचे उद्घाटन नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या 20 ते 21 वर्षापासून गोरक्षनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.गणेश उत्सवाच्या काळात गोरक्षनाथ तरुण मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते.नगर शहरात कोठेही सलग सात दिवस देखावा पाहण्यासाठी मिळत नाही.परंतु सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकातील गोरक्षनाथ तरुण मंडळांचे अध्यक्ष जालिंदर शिंदे यांच्या पुढाकारातून नगरकरांना सलग सात दिवस हा देखावा पहायला मिळणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी उद्घाटना प्रसंगी सांगितले.या वेळी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर शिंदे म्हणाले की मिरवणुकीत डीजेला केला जाणारा वायफट खर्च हा कुठेतरी धार्मिक,सामाजिक कार्यक्रमासाठी वापरला जातो यातच आनंद आहे.
यावेळी मा.नगरसेविक अनिल बोरुडे,मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,अभिजीत खोसे,सुमित कुलकर्णी,गोरक्षनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष जालिंदर शिंदे,उपाध्यक्ष नवनाथ शिंदे,संदीप म्हस्के,सुरज शिंदे,अक्षय शिंदे,जीशान सय्यद,अर्जुन शिंदे,सुनील शिंदे यांच्यासह गोरक्षनाथ तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.