Maharashtra247

पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून स्थानिक गुन्हे शाखेने केली उकल;खुनाचे कारण वाचा सविस्तर

अहमदनगर (दि.२२ सप्टेंबर):-श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात मयताची पत्नीच निघाली आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन गुन्ह्याची उकल.बातमीची हकिगत अशी की,

यातील फिर्यादी श्री. अन्वर बिराम शेख (रा. एकलहरे,ता.श्रीरामपूर) यांनी दि.21 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,त्यांची मुलगी बुशरा नईम पठाण ही आपले पती नईम पठाण व मुलांसह घरात झोपलेली असताना रात्री 01.45 वा.चे सुमारास अनोळखी 4 ते 5 इसमांनी घरात प्रवेश करुन बुशरा हिच्या डोक्यात बॅटरी मारुन तिला बेशुध्द करुन जावई नईम पठाण यास साडीने गळ्यास फास देवुन कपाटात ठेवलेले 7,00,000/- रोख व सोन्याचे दागिने असा एैवज चोरुन नेला आहे.

या घटने बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1014/2023 भादविक 394,396 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी व स्थानिक गुन्हे शाखेतील अमलदार यांनी घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करुन व साक्षीदारांना विचारपुस केली होती.मयत नईम पठाण याची पत्नी बुशरा पठाण हिस विचारपुस केली असता तिने सांगितलेली हकिगत व घटनास्थळी असलेली परिस्थीती यावरुन पोनि/श्री.दिनेश आहेर यांचा घटनेतील साक्षीदार बुशरा पठाण यांचेवर संशय बळावला होता.

त्या प्रमाणे बुशरा पठाण हिचेकडे महिला पोलीस अंमलदारा समक्ष विचारपुस केली असता तिने पती नईम पठाण याचेशी 10-12 वर्षापुर्वी लग्न झाल्याचे सांगुन पती नईम पठाण हा मागिल 6-7 वर्षापासुन नेहमी मनाविरुध्द लैगिंक छळ करत होता.या त्रासास कंटाळुन रात्री झोपताना त्याला दिलेल्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या घालुन गुंगी आल्यानतंर साडीचे एक टोक खिडकीचे गजास बांधुन त्याचे गळ्यास आवळुन साडीचे दुसरे टोक दोन्ही हाताने ओढुन पतीस जिवे ठार मारले अशी माहिती दिली.तसेच घरात चोरीस गेलेल्या सोन्याची दागिने व रोख या बाबत विचारपुस करता 1)महिला आरोपी बुशरा नईम पठाण हिने चोरीचा बनाव केल्याची कबुली दिल्याने तिस ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर,डॉ.श्री.बसवराज शिवपुजे उविपोअ श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,सफौ/बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,फुरकान शेख, पोकॉ/सागर ससाणे,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,मपोकॉ/सरग व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page