देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करायला आलेले दोघे मातोश्री जवळ जेरबंद एलसीबीची कारवाई
अहमदनगर (दि.२२ सप्टेंबर):-देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे जवळ बाळगणारे दोन आरोपी सोनई येथुन पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/ श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार यांना कारवाई करण्यास सांगितले होते.जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा बाबत माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की विशाल महाडीक रा.राहुरी हा साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगुन त्याची विक्री करण्यासाठी काळे रंगाचे मोटार सायकलवर घोडेगाव ते अहमदनगर रोडवरील मातोश्री लॉजिंग परिसरात येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळविली व पंचाना सोबत घेवून खात्री करून कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.
पथकाने लागलीच नगर घोडेगाव रोडने मातोश्री लॉजिंग परिसरात जावुन सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवर दोन संशयीत इसम लॉज जवळ येवून थांबले.पथकास त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दोघांना शिताफिने ताब्यात घेतले.ताब्यातील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) विशाल संजीत महाडीक रा. मानोरी,ता.राहुरी व २)सागर साहेबराव खांदे वय रा. येवला आखाडा,ता.राहुरी असे सांगितले.त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळुन आले.
त्याबाबत त्यांचे कडे विचारपुस केली असता त्यांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ३०,०००/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा, ९,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस व ५०,०००/- रुपये किंमतीची काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण ८९,०००/रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने या बाबत पोना/१८५ ज्ञानेश्वर नामदेव शिंदे ने.स्थानिक गुन्हे शाखा, यांनी सोनई येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं.४३७ / २०२३ आर्म अॅक्ट ३ /२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे सागर साहेबराव खांदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द ओतुर,पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. ४९४/२०२२ भादविक ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे,शदर बुधवंत,पोना/रविंद्र कर्डीले,ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले,पोकॉ/राहुल सोळुंके व चापोहेकॉ/अर्जुन बड़े यांनी केलेली आहे.