
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-भोजापुर पूर पाण्यासंदर्भात आता निमोण-तळेगाव गटातील गावागावात सहविचार बैठका सुरू आहेत.आज शेतकऱ्यांच्या उपस्थीतीत चिंचोली गुरव याठिकाणी निर्धार सभा पार पडली.
याच अनुषंगाने लोकप्रतनिधी,प्रशासन अथवा सरकारने जर या भोजापूर पूर पाणी संघर्ष बैठकांची अथवा येणाऱ्या काळात होणाऱ्या आमरण उपोषण,रस्ता रोकोच्या दखल घेतली नाही तर आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा,विधानसभा,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांमधील मतदानावर तळेगाव-निमोण गटातील लाभधारक क्षेत्रातील १० ते १२ गावे बहिष्कार टाकणार असून पुढारी व नेते मंडळींना देखिल गाव बंदी करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचा असणारे भोजापूर पूर पाणी पूर चारी द्वारे मिळवून देण्यासाठी व पूर चारी दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा.
अन्यथा आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी न्याय मिळत नाही तोपर्यंत अविरत संघर्ष करावा लागेल.अन्यथा जनता सर्वांना जागा दाखवून देईल आणि येणाऱ्या निवडणुकांमधील मतदानावर लाभधारक क्षेत्रातील जनता बहिष्कार टाकू असा पवित्रा शेतकरी नेते राजेंद्र सोनवणे व गणेश दिघे,सरपंच विलास सोनवणे,सरपंच भाऊसाहेब कडनर,किसन चत्तर,पांडूरंग फड,जनार्दन कासार,यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे.