चिंचोली गुरव येथील न्यू एकता मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप
संगमनेर (राजेंद्र मेढे):-राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी विसर्जन स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. व तसेच अनेक मिरवणुकांमध्ये नेत्यांनी देखील ढोल ताशाच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला यातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात चिंचोली गुरव येथे न्यू एकता मित्र मंडळाच्या वतीने यावर्षीही अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पाची पारंपारिक वाद्याने मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले.यावेळी तरुणांनी गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते.पारंपारिक वाद्य पथकाने तसेच डिजे लाऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली परंतु ढोल पथक, झांज,लेझीम हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे,उपाध्यक्ष आप्पासाहेब सोनवणे, खजिनदार विजय गोडगे, सचिव नवनाथ सोनवणे,मंगेश पगारे,इरफान पटेल,गोरक्षनाथ मेढे,सुखदेव वाघ,योगेश पाबळे,विजय पगारे,शामराव गोडगे, विनायक बिडवे,तसेच गावातील तरुण वर्ग,वयोवृद्ध व महिलांचाही मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग होता.