हार्मनी किड्स स्कूलमध्ये इको फ्रेंडली गणपती बनवण्याची स्पर्धा संपन्न विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
अहमदनगर (दि.२९ सप्टेंबर):-नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील नामांकित त्रावणकोर एज्युकेशन ट्रस्ट संचलित हार्मनी किड्स स्कूल येथे २६ सप्टेंबर रोजी इको फ्रेंडली गणपती बनवण्याची स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी ही सहभाग नोंदवला होता.स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून, झाडांच्या पानापासून व वर्तमानपत्रा पासून आकर्षक गणपती तयार केले होते.या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गांमधून दोन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.यामध्ये नर्सरी क्लासमध्ये अद्वेत हेमंत बोरसे याने प्रथम तर तनुज नितिकेश सब्बन याने द्वितीय क्रमांक पटकावला.एल.के.जी. क्लासमध्ये गार्गी संकेत शिंदे हिने प्रथम तर कृष्णा रवींद्र खंडागळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.यु.के.जी. क्लासमध्ये हर्षदा चंदन प्रसाद हिने प्रथम तर वैधवी कैलास पानसंबळ हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक गणपती बनवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.ही स्पर्धा पार पाडण्यासाठी वृषाली नीरखे,एलिझाबेथ वाघमारे, भावेशा वाधवानी यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य अशोक बेरड यांनी अभिनंदन केले.