संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील आदर्श गाव तिगाव येथे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री.साई गणेश तरूण मिञ मंडळ तीगाव यांच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
आज गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्वच विजयी स्पर्धकांना डॉ.नंदकुमार गोडगे यांच्या शुभहस्ते गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.गणेशोत्सवाच्या काळात सलग आठ दिवस निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.सर्वच यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तळेगाव दिघे येथील साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी विचार मंचावर श्री.साई गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील मान्यवर,कार्यकर्ते व १० दिवस गणपती मंडळासाठी सहकार्य करणारे सर्वच पदाधिकारी व बालगोपाळ,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानिमिताने अनेक मान्यवरांनी आपल्या मत व्यक्त कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भिमराज उगलमुगले सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.मयुर सानप यांनी मानले.यावेळी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने विद्यार्थाचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.