Maharashtra247

चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित संपुर्ण सुरक्षा केंद्र आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (दि.२८ सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,जिल्हा रुग्णालय अहमदनगर, स्नेहालय संचलित संपूर्ण सुरक्षा केंद्र,एकात्मिक सल्ला व समुपदेशन तपासणी केंद्र चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नागरिकांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला.या आरोग्य तपासणी शिबिरात १७० ते २४० रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.शिबिरा प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री.अमोल भंडारे,श्री. सूचित भळगट,श्री.महेश कुलकर्णी,श्री.नानासाहेब भागानगरे, श्री.मनीष भंडारे, ऍड.पराग देशमुख,श्री. आदिनाथ येंडे,जिल्हा रूग्णालय समुपदेशक सौ. शर्मिला कदम मॅडम, श्री.राहुल दौंडे सर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ तृप्ती सौ. मापारी मॅडम,सौ.प्रांजली झांबरे मॅडम,संपुर्ण सुरक्षा केंद्र अहमदनगर प्रकल्प व्यवस्थापक सागर फुलारी, शिबीर समन्वयक वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख, समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.

चौपाटी मिञ मंडळ ट्रस्ट यांनी मान्यवरांचे सर्वांचे सत्कार केले.यावेळी रुग्णांशी बोलताना समुपदेशक शर्मिला कदम मॅडम, राहुल दोंडे सर , सागर फुलारी यांनी रुग्णांना आरोग्य व तपासणी बाबत समुपदेशन केले.तसेच एच. आय.व्ही.एडस् प्रतिबंधक उपाय करण्यासाठी आपण समाजामध्ये एच.आय.व्ही. जनजागृती अभियान मार्फत जनजागृती करून एच.आय.व्ही.मुक्तभारत करू शकतो या बाबत माहिती सांगून ऑडिओ क्लिप द्वारे जनजागृती केली व माहिती पत्रक वाटप करण्यात आले.

तसेच रक्त तपासणी बाबत कोणकोणत्या चाचण्या केल्या जातील याबाबत तृप्ती मापारी मॅडम, प्रांजली झांबरे मॅडम प्रयोगशाळा तंत्रज्ञ,अरबाज शेख,वैशाली कुलकर्णी,यांनी माहिती दिली.शिबिरांत १७४ लोकांनी रक्ताच्या विविध चाचण्या केल्या.थायरॉईड, उच्च रक्तदाब,मधुमेह,लिव्हर विकार,वजन,उंची कावीळ, फुफुसाचे विकार,दमा निमोनिया,संसर्गजन्य आजार डेंगू,मलेरिया,एच.आय.व्ही, गुप्तरोग,किडनीचे टेस्ट, कॅन्सर सिरम कॅल्शियम, शुगर,हिमोग्लोबिन,इत्यादी मोफत रक्त तपासणी केल्या गेल्या.

खुद को दो संपुर्ण सुरक्षा का वादा….

शिबिर यशस्वीते साठी विशेष सहकार्य चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट श्री.अमोल भंडारे,श्री.सूचित भळगट,श्री.महेश कुलकर्णी,श्री.नानासाहेब भागानगरे,श्री.अक्रम पठाण, श्री.मनीष भंडारे,श्री.सुरेश महाले,ऍड.पराग देशमुख, श्री. आदिनाथ येंडे,समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी भालचंद्र झाडे,मंगेश राऊत, सोमनाथ गोडे,रोहन राऊत, गौरव राऊत,विनोद चव्हाण, करण लोंढे,विकी सुरडकर आरती डोके,आरती भोर संपुर्ण सुरक्षा केंद्र अहमदनगर यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page