ढगफुटी झाल्याने बंधारा फुटून शेकडो एकर पिके गेली वाहून;तहसीलदारांनी लवकर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
पारनेर (प्रवीण तांबे):-पारनेर तालुक्यातील गोरेगांव, डिकसळ परीसरात काल दिवसभर मुसळधार व रात्री ढगफुटी झाल्याने गोरेगांव येथिल ढवळदरा वस्तीवरील सर्वात वरचा बंधारा फुटून शेकडो एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
बंधाऱ्याखालील शेती व शेतामध्ये असलेले पिके बाजरी,सोयाबीन,शेवंती व इतर पिके वाहून गेले आहेत. बंधारा फुटल्याने बंधारा खालील शेती वाहून गेली, त्यात राजू नांगरे,रावसाहेब नांगरे,बाबासाहेब नांगरे,भाऊ नांगरे,दीपक नरसाळे, भास्कर नरसाळे आदी शेतकऱ्याचे शेतीसह पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बंधारा फुटून शेकडो एकर जमीन व पिके गेली समजताच चेअरमन श्री.संभाजीराजे,ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रवीण नरसाळे, गोरख नरसाळे,भाऊ नांगरे ,दीपक नरसाळे, भास्कर नरसाळे सुदर्शन नरसाळे,राजू नांगरे,रावसाहेब नांगरे,बाबासाहेब नांगरे, अक्षय नरसाळे यांनी तात्काळ बंधाऱ्याकडे धाव घेऊन पाहणी केली.तहसीलदार यांना घडलेल्या घटनेची भ्रमणध्वरीद्वारे कल्पना देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली.