
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील शिरोळे मळा येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले असून गुरे बांधण्याच्या कारणावरून शेतकर्याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
हि घटना गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ०९:४५ वाजेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चौघां विरुद्ध गुरनं ४८१/२०२३ भादविक ३०७,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी तिघां आरोपींना अटक केली आहे.खंदरमाळवाडी गावा अंतर्गत असलेल्या शिरोळेमळा येथे भास्कर पाटीलबा शिरोळे हे शेतकरी राहात आहे.गुरूवारी सकाळी पावनेदहा वाजेच्या सुमारास गट नंबर(४४६) मध्ये गुरे बांधली होती.यामुळे गुरे बांधण्याचा राग आल्याने तान्हाजी रामभाऊ शिरोळे याने हातातील लोखंडी कोयत्याने भास्कर यांच्या डोक्याच्या उजवे बाजूला दोन वेळा वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तसेच अमोल तान्हाजी शिरोळे याने बांबुच्या काठीने मारहाण केली.
त्यानंतर सुभाष तान्हाजी शिरोळे व अलका सुभाष शिरोळे या दोघांनी हाताने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.लाकडी बांबूचे काठीने मारहाण केली. भास्कर शिरोळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहे.