
अहमदनगर (दि.२९ सप्टेंबर):-दारुचे व्यसन व त्रासास कंटाळुन मयताची पत्नी व भावाने केला होता खुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत खुनाच्या गुन्ह्याची केली उकल,
बातमीची हकिगत अशी की, दि.२५ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील महादेवाडी रोडचे पुलाजवळ,लोणी व्यंकनाथ शिवार येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी यातील अनोळखी मयत इसमाचा दोरीने गळा आवळुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे तोंड जाळल्याने अनोळखी आरोपी विरुध्द पोसई/संपत सुर्यभान कन्हेरे यांच्या फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुरनं.८३०/२०२३ भादविक ३०२,२०१ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या
खुनाची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेपथक नेमुन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास लागलीच रवाना केले.पथकाने घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन बेवारस मृत इसम हा बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी,(रा.सुकेवाडी,ता.संगमनेर) याचा असल्याचे निष्पन्न केले. त्यावरुन मयताचे कुटूंबियांकडे विचारपुस करुन मयत बाबासाहेब गोसावी याचे बाबत माहिती घेत असताना मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज यांचे बोलण्यात विसंगती आढळुन आल्याने पथकाने मयताचा भाऊ नामे मनोज गोसावी याचेकडे अधिक सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने मयत भाऊ बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी यास दारु पिण्याचे व्यसन होते.
तो दारु पिऊन आईवडील व कुटूंबियांना मारहाण करुन सारखा त्रास देत होता.दि.२४ सप्टेंबर रोजी भाऊ बाबासाहेब गोसावी हा दारु पिऊ त्रास देवु लागल्याने. मी,वहिनी अनिता व चुलतभाऊ सौरभ अशांनी बाबासाहेब याला दारु जास्त झाल्याने दवाखान्यात जायचे आहे असे म्हणुन स्विफ्ट गाडीत बसवले व रस्त्याने जाताना बाबासाहेब दारुच्या नशेत असताना त्याचे गळ्यात गाडीतील दोरी घालुन गळा आवल्याने तो मरण पावला व त्यानंतर नगर दौंड रोडवर रेल्वेट्रॅक जवळ टाकुन, त्याची ओळख पटु नये म्हणुन त्याचे तोंडावर गाडीतील सिट कव्हर व पेट्रोल टाकुन पेटवून दिल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे १) मनोज किशोर गोसावी व २) सौरभ मनोज गोसावी ३) अनिता बाबासाहेब ऊर्फ गणेश गोसावी सर्व रा.सुकेवाडी,ता. संगमनेर यांना ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले.पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व विवेकानंद वाखारे उविपोअ,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/बबन मखरे, देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल, फुरकान शेख,पोकॉ/रोहित मिसाळ,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,आकाश काळे,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,मपोना/भाग्यश्री भिटे,ज्योती शिंदे,चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.