
मुंबई प्रतिनिधी/अलका घाटे (दि.२९ सप्टेंबर):-भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या कार्यकारणी सदस्यपदी मुंबईतील भोई समाजातील सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई घाटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गजानन गाते यांनी काढले आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.