
घारगाव प्रतिनिधी(आदेश वाकळे):-सध्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागात रस्त्यांचा चांगलाच बोजवारा उडाला आहे.

यात सध्या घारगाव ते कोठे बुद्रुक या सात किलोमीटर व पुढे पिंपळदरी या रस्त्याची चाळण झालेली आहे.व अनेक अतिक्रमने या रोडवर करन्यात आली आहेत.अतिक्रमने काढायचे कोणी? हा वादाचा मुद्दा असल्याने गेल्या 20 वर्षात खुद प्रशासनाने देखील यात हात घातला नाही मात्र संगमनेरचे काश्मिर म्हनुन ओळखल्या जाणाऱ्या कोठे बुद्रुक ग्रामस्थांनी यात अखेर हात घालत अतिक्रमण काढन्याची सुरूवात आपल्याच गावापासुन केली आहे.
कोठे बुद्रुक येथील अमृत नगर येथे सर्व गावकरी सरंपंच,उपसरपंच, सदस्य,व ग्रामसेवक यांनी ऐकत्र येत शेतकऱ्यांना विश्वासात घेत ही अतिक्रमने काढली आहे.या मोहीमेच पंचक्रोशीतुन व वाहनाधक आणि वाटसरू यांच्याकडुन स्वागत होत आहे.कोठे-घारगाव रोडच्या पाण्याच्या डबकाल स्थानिक वृत्तवाहिन्यांनी स्विमींग पुलची उपमा दिल्याने हे डबके हस्याचा विषयही काळ झाली होती मात्र आता कोठे बुद्रुक येथील सुमारे एक किलोमीटर परिसरात अतिक्रने काढल्याने रोडच्या पाण्याची विल्हेवाट काहीतरी होण्यास मदत मिळनार आहे.
यावेळी अकोले बांधकाम विभागाचे कातोरे,कोठे बुद्रुक गावचे सरपंच आशिष वाकळे,उपसरपंच किरण वाकळे,ग्रामसेवक विठ्ठल शिरोळे,तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास वाकळे,सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव,अशोक भालके,चंद्रकांत आरोटे, विक्रम वाकळे,अक्षय जाधव,रमेश वाकळे,वैभव हांडे,निलेश हांडे, सुभाष वाकळे,सुनील वाकळे,पंडित भालके,संकेत भालके, विशाल वाकळे,कैलास जाधव व इतर सर्व कोठे बुद्रकचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लवकरच कोठे बुद्रुक गावातीलच पैसैवाडी रोडचे अतिक्रमणे आम्ही काढनार आहोत.अृतनगर येथील अतिक्रमणे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले तशाच योगदानाची पैसेवाडी रोडलगतच्या ग्रामस्थांकडून गावाला अपेक्षा आहे.लवकर पैसेवाडी रोडही सुटकेचा श्वास घेईल ही आम्हाला खात्री आहे.असे शांतारामशेठ वाकळे(माजी संचालक कृ.उ.बा.स.संगमनेर) यांनी या वेळी सांगितले.