
अहमदनगर (दि.३ ऑक्टोबर):-अहमदनगर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ शिंदे व शहर जिल्हाध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी तसे पत्र मुंबईत दिले.यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप,सामाजिक कार्यकर्ते गिरीश गायकवाड,उद्योजक किरण कातोरे,पै.अंकुश मोहिते,सिद्धार्थ आढाव सर,समिर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.