
संगमनेर(राजेंद्र मेढे/दत्तात्रय घोलप)दि.४ ऑक्टोबर:-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावचे कर्तव्यदक्ष सरपंच विलास (आण्णा) रामराव सोनवणे यांच्या मातोश्री तसेच संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक कै.रामराव सोनवणे यांच्या पत्नी कुसुमबाई रामराव सोनवणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.कुसुमबाई सोनवणे जाण्याने सोनवणे परिवारात व चिंचोली गुरव गावात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पाश्चात मोठा परिवार आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे.