संगमनेर मधील या गावात सरपंचाची दादागिरी ग्रामस्थाला केली मारहाण
संगमनेर/दत्तात्रय घोलप (दि.४ ऑक्टोबर):-संगमनेर तालुक्यातील वडगांवपान या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या गावात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे वडगावपान गाव चांगलेच चर्चेत आले आहे.
दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास ठराव आणला होता.याच वादातून रविवारी १ ऑक्टोबर रोजी सरपंच श्रीनाथ कोंडाजी थोरात यांनी गावातील ग्रामस्थ रमेश यादव थोरात यांना मारहाण केली.या प्रकरणी रमेश थोरात यांनी तालुका पोलीस ठाण्यात सरपंचा विरोधात फिर्याद दिली तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ९७४ / २०२३ भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडगांवपान ग्रामपंचायत सरपंच श्रीनाथ कोंडाजी थोरात हे विकास कामात सदस्यांना विश्वासात घेत नाही,आर्थिक वर्षाचा हिशोब सादर केला नाही,ग्रामसभा व मासिक सभा वेळेवर घेत नाही,मनमानी पद्धतीने कारभार करतात,चुकीचे ठराव आहे.पास करण्याचा आग्रह करतात त्यामुळे यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.
दरम्यान रविवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर याबाबत राजकीय वादंग सुरू असतांना व त्याठिकाणी मोठी गर्दी झालेली असतांना फिर्यादी रमेश यादव थोरात हे काय झाले म्हणून पाहण्यासाठी गेले असतांना सरपंच श्रीनाथ थोरात यांनी रमेश थोरात यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच हाताने मारहाण केली. तसेच जर पुन्हा येथे आलास तर तु व तुझ्या कुटूंबाला संपवून टाकेल अशी धमकी दिली.