
अहमदनगर (दि.६ ऑक्टोबर):-नगर तालुक्यातील आरणगाव चौकामधून टिपर चोरीकरुन नांदेड जिल्ह्यात स्क्रॅप करत असल्याचे समजताच नगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकून टीपर जप्त केला.
बातमीतील हकीकत अशी की,दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर बाळु कुंजीर रा.बाबुर्डी घुमट, अहमदनगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की रात्री 8/30 वाजता मी व माझा ड्रायव्हर असे आमचे टाटा कंपनीचा टिपर (ट्रक) एमएच 16 Q 7978 हा विट कामाचे भाडे करुन नेहमी प्रमाणे आरणगाव,चौकाजवळील इसार पेट्रोल पंपावर लावून सदर वाहन लॉक करुन आम्ही आमचे घरी निघून गोलो त्यानतर सकाळी 06.00 वाजण्याच्या सुमारास मला माझ्या मोबाईलवरती सदर टिपरच्या जिपीएसचा मॅसेज आल्याने मी लगेच पार्क केलेल्या आरणगाव चौकाजवळ इसार पेट्रोल पंपावर जावून पाहणी केली असता मला सदर ठिकाणी माझा टिपर दिसला नाही मी आजू बाजूला चौकशी केली असता मला सदर टिपर आढळून आला नाही म्हणून मी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुरंन 755/2023 भादवी कलम 379 प्रमाणे फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला.
या घटनेचे गांर्भिय लक्ष्यात घेवून श्री. शिशिरकुमार देखमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी नगर तालुका पोलिसांचे पथक तयार करुन सदर चोरी गेलेला टिपर व आरोपी याचा शोध घेण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले.त्यानुसार सदर पथकाने टिपरला लावलेले जिपीएस चेक केले असता सदर जीपीएस हे माजलगांव जिल्हा बीड येथेच बंद केले असलेचे समजले त्यानंतर सदर पथकाने रोडवरील सिसिटीव्ही कॅमेरे चेक करुन सदर चोरी गेलेला डंपरचा रोड रुट फिक्स केला त्यावेळी पथकाला समजले की, सदर गुन्हयातील चोरी गेलेला टंपर हा नांदेड च्या दिशेने गेलेला आहे त्यानुसार सदर पोलीस पथक हे नांदेड येथे जावून स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड यांच्या मदतीने भंगार दुकाणावर कुठे टिपर स्क्रॅप करतात याची माहिती घेत असताना गुप्त माहिती भेटली की सदर गुन्हयातील चोरी गेलेला टिपर हा नांदेड येथील लातूर रोडवरील एका भंगारच्या दुकाणामध्ये स्क्रॅप करण्याचे काम चालू आहे.
त्यानुसार सदर पोलीस पथक हे तात्काळ भंगारच्या दुकाणावरती जावून पाहणी केली असता त्याठिकाणी सदर चोरी गेलेला टिपरची दोन इसम तोडफोड करुन स्क्रॅप करताना मिळूल आला सदर ठिकाणी मिळून आलेल्या इसमाला ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अख्तरखा ताहेरखा पठाण रा.पीरबुऱ्हान नगर नांदेड व गजानन संभाजी भोसले रा.सुहगण ता.पूर्णा जिल्हा परभणी असे असलेचे सांगितले त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला टिपर हाच असून तो आंम्ही दोघानी अहमदनगर जिल्हयातील आरणगाव चौक येथील इसार पेट्रोल पंपाजवळून चोरी केलेला आहे अशी कबुली दिली. त्यानंतर सदर आरोपी व सदर चोरी गेलेल्या टिपरची चेसी बॉडी व इतर साहित्य असे साहित्य घेवून नगर तालुका पोलीस स्टेशन येथे जमा केली.
सदर गुन्ह्याचा तपास मपोहेकॉ/कविता हरिशचंद्रे हे करीत असून या आरोपीना मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,उप विभागीय पोलीस अधिकारी,ग्रामीण श्री.संपतराव भोसले,सपोनि शिशिरकुमार देशमुख,पोउनि युवराज चव्हाण,पोहेकॉ/सुभाष थोरात,पोकॉ/कमलेश पाथरुट,सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे,सागर मिसाळ व मपोहेकॉ/कविता हरिशचंद्रे यांनी केली आहे.