दोघांवर आठ गोळ्या फायरिंग करून फरार असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने पिस्टलसह केले जेरबंद
अहमदनगर (दि.१५ ऑक्टोबर):-ठाणे जिल्ह्यात दोघांवर आठ गोळ्या झाडून फरार असलेल्या पोलिस दलातील कर्मचाऱ्याला नगर मधील कोल्हार येथून जेरबंद करण्यात डीवायएसपी संदिप मिटके यांच्या पथकाला यश आले आहे.
बातमीत हकीकत अशी की,ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण मधील पडघा पोस्टेच्या हद्दीमध्ये दि.13 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रीच्या सुमारास मैदे गावाजवळ ता.भिवंडी येथे आरोपी नामे सुरज देवराम ढोकरे याने फिर्यादी अजिम अस्लम सय्यद आणि त्याचा आतेभाऊ फिरोज रफिक शेख यांच्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अजिम यांच्यावर 6 आणि फिरोज यांच्यावर 2 गोळ्या सरकारी ग्लॉक 19 Made in USA या पिस्तूलातुन झाडल्या याबाबत पडघा पोस्टे येथे गुरनं 533/23 भादंविक 307,3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी हा अहमदनगरकडून नाशिकच्या दिशेने जात असल्याबद्दलची माहिती पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांना मिळाली.त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्याकरिता तीन पथके तयार करून कोल्हार येथे नाकाबंदी केली.आणि आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक 19 पिस्टलसह कोल्हार बस स्टँडवरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.हा आरोपी मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालय QRT मध्ये आर्मरर या पदावर कार्यरत आहे.
आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक,स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके,API युवराज आठरे, PSI योगेश शिंदे,ASI बाबासाहेब लबडे,HC दिनेश चव्हाण,HC सुरेश पवार,HC एकनाथ सांगळे,HC भाऊसाहेब आव्हाड,PN रवींद्र मेढे,PN निलेश धाधवड ,PN अशोक शिंदे,PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे,PC अमोल फटांगरे चालक HC वर्पे व चालक PC ज्ञानेश्वर गांगुर्डे, होम हारदे,होम अभिजित साळवे, होम विशाल राऊत, होम गणेश साळुंके यांनी केली आहे.