Maharashtra247

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये जिल्ह्या पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना 

अहमदनगर (दि.१५ ऑक्टोबर):-नगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला तसेच उद्योजक रविराजजी पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना व देवीची महाआरती करण्यात आली.

यावेळी तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे,सुनिता कानडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,पोहेकॉ दत्तात्रय जपे, गोपाळराव सजनुले,नवनाथ आंधळे,लक्ष्मीकांत दंडवते, ओमप्रकाश तिवारी,स्मिता शितोळे,लतिका पवार, दत्तात्रय तांबे,अमन तिवारी, यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ,युवक मंडळ व पदाधिकारी,भाविकभक्त घटस्थापना व महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य दिव्य मंडप, देवीच्या गाभाऱ्यात केलेली आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट,डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक प्रकाश योजनामुळे मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.दररोज दुपारी विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत.याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ,सामुदायिक कुंकूमार्चन सोहळा,नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी भव्य दिव्य रावण दहन सोहळा तसेच हिंदू धर्मसभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तसेच दररोज संध्याकाळी देवी महात्म्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये देवीच्या विविध रूपांमधली माहिती भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परमपूज्य गजानन दादा शास्त्री महाराज यांचे देवी महात्मे या विषयावर कथा प्रवचन होणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी दिली.त्यामुळे परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तुळजाभवानी महिला मंडळ, युवक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page