Maharashtra247

नवरात्रीत “या “कार्यक्रमांना पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

 

अहमदनगर (दि.१६ ऑक्टोबर):-सध्या नवरात्री उत्सव सुरु असून अनेक मंडळे गर्दी होण्यासाठी हिरोईन,टीव्ही कलाकार, रिल्स ऍक्टर आणतात त्याचा फायदा ना मंडळाना होतो ना समाजाला उलट या मुळे देवीचे पवित्र्य राखले जात नाही.

नवरात्रीचे पवित्र्य राखायचे असेल तर समाज प्रबोधनकार किंवा समाजसेवक आणून समाज प्रबोधन होईल असे कार्यक्रम घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केले आहे.नवरात्री उत्सव हे धार्मिक उत्सव असून अनेक मंडळाकडून याचे पवित्र्य राखले जात नाही,दारू पिऊन कार्य केले जाते, उत्सवा मध्ये अनेक टी व्ही कलाकार,रिल्स ऍक्टर आणून कार्यक्रम घेतले जातात या मुळे देवीचे कोणतेही पवित्र्य राहत नाही व या गोष्टीमुळे अनेक अनर्थ घडल्याचे प्रामुख्याने दिसून येते,या साठी समाज प्रबोधन व्हावे,समाजाला धार्मिक व सामाजिक फायदा व्हावा या उद्देशाने गीत रामायण, महाभारत,शिवाजी महाराज, संभाजी महाराज,ज्ञानेश्वर यांच्यावर आधारित नाट्य आणुन समाज प्रबोधन करावे.

जर हे कार्यक्रम बिग बजेट असेल तर कमी बजेट वाले एकपात्री अभिनय करणारे अनेक कलाकार आहेत त्यांना आणून माँ जिजाऊ, झाशीची राणी,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे बाबत कार्यक्रम घेतल्यास मोठया प्रमाणात समाज प्रबोधन होऊन नवरात्री चे पावित्र्य ही राखले जाईल असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.जी मंडळे फिल्मी कलाकार,टी व्ही ऍक्टर, रिल्स ऍक्टर आणून कार्यक्रमे घेतील त्यांना प्रशासनाने ही परवानगी देऊ नये व समाजानेही अश्या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा असे आवाहन बोज्जा यांनी केले.

You cannot copy content of this page