
मिरजगाव प्रतिनिधी:-मिरजगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पतीचा सुरू असलेल्या सावळा गोंधळा विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या ग्रामपंचायतला १७ सदस्य आहेत.या ग्रामपंचायतीस महिला सरपंच असून या ग्रामपंचायतचा कारभार त्यांचे पती पहात असून सर्व निर्णय मनमानी पद्धतीने तेच घेतात.त्यांच्या या स्वभावामुळे मिरजगावचा विकास गेल्या सात वर्षांपासून खुंटला असून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी देखील परत जात आहे.तालुक्यातील खेड्यापाड्यांच्या ग्रामपंचायतींचा विकास झाला परंतु मिरजगावचा नाही.त्यामुळे ६ विरुद्ध १० एक तटस्थ अशा पद्धतीने सदस्यांची विभागणी झाली असून ग्रा.प.सदस्य डॉ.शुभांगीताई गोरे,डॉ.रजनी कोरडे,डॉ.पंढरीनाथ गोरे, उज्वला घोडके,त्रिवेणी फरताडे,अनिता कोल्हे,अंजुम आतार,संदीप बुद्धिवंत, प्रकाश चेडे,सागर पवळ, यांनी महिला सरपंच पतीच्या विरोधात एल्गार केला.
गावच्या विकासासाठी दहा सदस्य एकत्र आले असून दि. १२/१०/२३ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत यांना लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली असून न झालेल्या कामांचं तपशील निवेदनातून दिला आहे.दि.१०/०६/२३ पासून अनिस इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अधिकृत नळ जोडणी करून घेतली यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही,तसेच सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसताना सरपंच पतीने पत्नीच्या सरपंच पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्याचा निळा केला तसेच वळगाव वेशीमधील दलित वस्तीचा सिमेंट काँक्रेटचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जेचा केला असून याबाबत तक्रार केली असता त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे चौकशी होऊन क्वालिटी कंट्रोल यांनी तपासणी केली.
यावेळी सर्व कामकाज बंद करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी मिरजगावचे मा. उपसरपंचअमृत लिंगडे,डॉ.पंढरीनाथ गोरे, डॉ.चंद्रकांत कोरडेकुलदीप गंगावणे,शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी नवले,अच्युत विर,आनंता त्र्यंबके,नारायण घोडके,सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती घोडके,भगवान घोडके,सलीम आतार यांनी भाषणे करून तीव्र संताप व्यक्त केला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.