
अहमदनगर (दि.२३ ऑक्टोबर):-उत्कर्ष बालभवन,लालटाकी या ठिकाणी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रविण कदम यांनी बालभवन मधील मुला व मुलींना स्व संरक्षण या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी मुलींच्या मानसिकतेवर घरच्यां सोबत व्यवस्थित समन्वय नसल्याने होणारे परिणाम तसेच त्यामुळे होणारी मुलींची फसवणूक अशा बाबीची महत्त्व पटवून दिले.
तसेच कोणी आपत्कालीन परिस्थितीत कोणी हल्ला करत असेल तर समोरच्याला कोणत्या वीक पॉईंटला मारल्यावर आपले संरक्षण होऊ शकते हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातुन संरक्षणाचे धडे दिले.आजच्या कार्यक्रमास बालभवनच्या प्रकल्प व्यवस्थापिका सौ.उषा खोल्लम,समुपदेशक सौ.निलोफर शेख,उत्कर्ष बालभवनच्या समन्वयका श्रीमती.रुबिना शेख उपस्थिती होते.व बालभावनातील 55 मुले हजर होती.