
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील विकासाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवकौठे येथे रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजाता विविध विकासकामांसह देवकौठे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला.
देवकौठे ग्रामस्थ,विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले.देवकौठे सोसायटीच्या नूतन इमारत विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी जी.प सदस्य महेंद्रशेठ गोडगे, राजहंस दूध संघाचे संचालक तसेच कांदा व्यापारी भारतशेठ मुंगसे, नाशिकचे माजी नगरसेवक भागवतराव आरोटे,युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा उत्तर कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे,नीलकामल उद्योग समूहाचे एकनाथराव मुंगसे,चिंचोली ग्रामपंचायतचे सरपंच विलास सोनावणे,हौशीराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर,सोसायटीचे विदयामान चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे,व्हा.चेअरमन मच्छिंद्र सांगळे,सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र कहांडळ,जगदंबा दूध डेअरी चेरअरमन राजेंद्र मुंगसे,यांसह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ,देवकौठे ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ,महीला भगिनी,तळेगाव गटातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कहांडळ,सुभाषराव सांगळे,भागवतराव आरोटे,भारतशेठ मुंगसे,ज्ञानेश्वर मुंगसे, यांनी मनोगत व्यकत केलें.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाषराव सांगळे यांनी केले व आभार तर सोसायटीचे विद्यमाने चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे यांनी मानले.