
अहमदनगर (दि.२३ ऑक्टोबर):-अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या एका पुरातन शिव मंदिरात असलेल्या महादेवाच्या पिंडीची अज्ञात लोकांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत तक्रार देण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली आहे.पुरातन मंदिर असलेल्या कपिलेश्वर मंदिरात हा प्रकार घडला असून हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर याबाबत तक्रार देण्यासाठी विश्वस्तांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.आमदार संग्राम जगताप उपमहापौर गणेश भोसले,शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम,अभिजीत खोसे,प्राध्यापक माणिक विधाते,नगरसेवक अविनाश घुले या वेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.