
अहमदनगर (दि.२३ ऑक्टोबर):-संगमनेर तालुक्यातील शिवपानंद शेतरस्ते तातडीने खुले करून ह.भ.प.रोहिणीताई राऊत यांचा चालु शेतरस्ता बंद करत त्यांची अवहेलना झालेल्या प्रकरणाची चौकशी करत संबंधितावर कारवाई करून पिकाची नुकसान भरपाई देवून महसुल प्रशासनाने शेतरस्ता त्वरित खुला करून रस्ता केसेस प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी केली आहे.
राज्य सरकारकडून समृद्ध गाव समृद्ध शेतकरी समृद्ध महाराष्ट्राच्या घोषणा फक्त कागदावर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. सरकार बदलले की शासन निर्णय बदलले जातात परंतु प्रत्यक्ष शासन निर्णयाची अंमलबजावणी कोठे होताना दिसत नाही ग्रामीण भागातील शेतकरी शेतरस्त्यासाठी प्रशासकीय पातळीवर हेलपाटे मारत आहे त्याला न्याय देण्यासाठी शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने संगमनेर तालुक्यामध्ये शेत तिथे रस्ता गाव तेथे समृद्धी अभियान राबवत संगमनेर शासकीय विश्राम गृहावर अभियान घेऊन शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत समस्या समजून घेण्यात आल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने शिव पानंद शेत रस्ता तातडीने ६० दिवसांच्या आत खुले करुन द्यावेत तसेच ह.भ.प.रोहिणीताई राऊत यांचा पिंपळगाव देपा येथील चालु शेत रस्ता बंद केल्यामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देऊन शेतरस्ता त्वरित खुला करावा तसेच संबंधितांनी केलेल्या अवहेलनेची गंभीर दखल खेऊन चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी संगमनेर तालुक्यातील प्रलंबित शेतरस्ता केसेस संदर्भात दिरंगाई करणार्या संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
समृद्ध शेतकरी, समृद्ध गाव, समृद्ध महाराष्ट्रासाठी वरिल विषयांचा सहानुभूती पुर्वक विचार करून शेत तिथे रस्ता देवून शेतकरी राजाला न्याय द्यावा या संदर्भातील निवेदन संगमनेर तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीने आले यावेळी नायब तहसीलदार ऋतुजा पारखे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,दत्तात्रय गुंजाळ,दिग्विजय फटांगरे,हभप.रोहिणीताई राऊत,कुंदा शिंदे,पूजा शिंदे , बाळासाहेब शिंदे,सुखदेव हासे,गोपाळे,दत्तात्रय शिंदे संदीप शिंदे,बाळासाहेब घुले, संपत घुले,हासेकेरू वाटेकर , संजय फटांगरे,लहानु देवके,रमेश डफळ,सचिन राठोड,प्रशांत राऊत,गोविंद कुदळ आदी शेतकरी उपस्थित होते.