
अहमदनगर (दि.23 ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांची निवड करण्यात आली आहे.अहमदनगर येथे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
यावेळी कनिंगध्वज म्हणाले की जिल्ह्यात पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारां बाबत ठोस भूमिका घेऊन पदाच्या माध्यमातून प्रामाणिक पणाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.प्रभंजन कनिंगध्वज यांनी वृत्तपत्रात जिल्ह्यात मोठी जबाबदारी सांभाळत पत्रकारांचे मोठे जाळे तयार केले त्याचीच पावती म्हणून कनिंगध्वज यांची निवड करण्यात आली. तांबे यांनी नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.