Maharashtra247

वाहतुकीचे नियम पाळूया;अपघाताला पूर्ण विराम देऊया-प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनिल गोसावी..!!परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे  विद्यार्थी-पालक मेळावा प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन..!! 

राहुरी (दीपक हरिश्चंद्रे):-मुलं ही देवा घरचे फुल असतात.

ते देशाचे भविष्य आहे संगोपन आणि शिक्षण देत असताना आपल्या लहानग्यां विद्यार्थ्यांची घरापासून ते शाळेपर्यंत आणि शाळेपासून ते आपल्या घरापर्यंत प्रवास करत असताना तो कशा पद्धतीने होतोय याकडे आपण एक ‘ पालक’ या नात्याने आपले आद्य कर्तव्य आहे, आपले मुलं शाळेत जात असताना ते ज्या बस मध्ये गाडीमध्ये प्रवास करत असतात ती बस सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असली पाहिजे त्या गाडी ही मुदत बाह्य झालेली नसावी तिचे विमा आणि इतर सर्व बाबी नी परिपूर्ण असली पाहिजे.चालक हा निर्व्यसनी असायला हवा तसेच मोटरसायकल वरून शाळेपर्यंत प्रवास करताना पालकांनी देखील हेल्मेटचा जरूर वापर करावा, प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलणे टाळावे.तसेच शाळेच्या वेळेपूर्वीच दहा-पंधरा मिनिटे अगोदरच पोहच होईल अशा बेतात आपण घरून निघावे म्हणजे रस्त्यावर जाता येता घाई गडबड होणार नाही पर्यायाने अपघात देखील होणार नाही आणि वाहतुकीचे सर्वच नियम हे सर्वांसाठीच आणि आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच बनवलेले असतात त्याचे पालन करावे जेणेकरून आपले आणि आपल्या लहान विद्यार्थ्याचे कुठल्याही प्रकारचा अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही आणि हे सर्व नियम पाळल्याने आपल्या लहान बालकांवर देखील त्याचे सुसंस्कार हे लहानपणापासूनच होईल त्यातून ते  धडा घेतील.

तसेच विद्यार्थ्यांनी बस मध्ये प्रवास प्रवासादरम्यान विनाकारण ड्रायव्हिंग केबिनमध्ये प्रवेश करत जाऊ नये सर्व तार करत असताना हळुवारपणे चढावे खिडकीमधून कधीही हात बाहेर काढू नये तसेच चालत्या गाडीमध्ये धिंगाणा मस्ती करणे टाळावे असे आवाहन सोमवार तारीख ०६ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वरवंडी येथील श्री.विजय मेहेत्रे यांच्या वस्तीवर दीपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला आयोजीत केलेल्या विद्यार्थी-पालक मेळाव्या प्रसंगी श्रीरामपूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.सुनील गोसावी यांनी विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर विभागाचे मोटार वाहन निरीक्षक धीरज भामरे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनील गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नर्सरी आसो.उपाध्यक्ष श्री अशोक उंडे हे होते ह्या मेळाव्या करीता सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय कृषी विद्यापीठ, राहुरी येथील ज्ञानगंगा विद्यालय,बाल विद्या मंदिर यांनी आपला सहभाग नोंदवला होता बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित होते.

तसेच यादरम्यान ज्ञानगंगा विद्यालयाचा विद्यार्थी शार्दुल पाखरे,वेदिका काळे व संस्कृती सोनवणे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच राहुरी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.गोरे,सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राचार्य खेत्री, तुपविहीरे,श्रीमती.खळेकर मॅडम,ज्ञानगंगा विद्यालयाचे श्री.मिसाळ,बाल विद्यामंदिर चे आदर्श शिक्षक श्री. रासकर, तसेच श्री शाहू विद्यामंदिर खडांबे येथील सेवानिवृत्त ह.भ.प.भाऊसाहेब खळेकर आदी.शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  नर्सरी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक मुंडे,युवा उद्योजक बंटी अडसुळे, गोरक्षनाथ आडसुरे,कृषी भूषण पवार,गटविकास अधिकारी अनंत परदेशी, कार्यालयीन अधीक्षक सुनील सरोदे,महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त राजेंद्र मेहत्रे आदी. आवर्जुन उपस्थित होते.सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे श्री तुपविरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की असा विद्यार्थी-पालक मेळावा एका बस चालकाने आजोजित करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात प्रथमच होत आहे. खरंतर हा मेळावा आयोजित करणे हे शाळेचे कर्तव्य असते आणि त्यातच आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्याकरता परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील मार्गदर्शन करता बोलवले असल्या मुळे मी आयोजकाचे मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाचे आयोजक विजुभाऊ मेहेत्रे ज्यावेळेस विद्यार्थ्यांची शाळेपासून तर त्यांच्या घरापर्यंत प्रवास करत असताना ते अस समजतात की हे सर्व मुल आपलीच आहे.  त्यांची ते विशेष काळजी घेतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये GPS सिस्टीम असल्यामुळे. तर आम्हा शिक्षकांना आणि पालकांना देखील याचा खूप उपयोग होतो. गाडी कधीपर्यंत येईल किंवा केव्हा पोहचेल याचा तर्क लावता येतो.

 

 

 

 

You cannot copy content of this page