Maharashtra247

जुने नायगाव प्राथमिक शाळेत दीपोत्सव आनंदाचा व विद्यार्थी दिवस कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्रीरामपूर (ॲड.प्रशांत राशीनकर):-श्रीरामपूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने या शाळेत दरवर्षीप्रमाणे गटशिक्षणाधिकारी श्रीम.साईलता सामलेटी मॅडम यांच्या संकल्पनेतुन यावर्षीही दीपोत्सव आनंदाचा उपक्रम साजरा करण्यात आला.

तसेच ७ नोव्हेंबर या विद्यार्थी दिवसानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर पाटील होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी दीपोत्सव आनंदाचा या उपक्रमामुळे वर्षभर शालेय पोषण आहार योजनेचे उत्तम काम पाहणाऱ्या माता-भगिनींचा यानिमित्ताने गौरव होऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करणे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांबरोबर गरीब,वंचित घटकातील विद्यार्थ्यांनाही दिवाळीनिमित्त फराळ मिळाल्याने त्यांचाही आनंद द्विगुणित होतो हा हेतू स्पष्ट केला.शिक्षिका सुजाता सोळसे यांनी विद्यार्थी दिनानिमित्त एक पणती समतेची यातून सामाजिक संदेश देऊन संविधान व विद्यार्थी दिवसाचे महत्व सांगितले.यावेळी शालेय पोषण आहार काम पाहणाऱ्या सौ.इंदुबाई संपत लांडे व सौ.पूजा निलेश लांडे यांना साडी व दिवाळीचे फराळ देऊन गौरविण्यात आले.

तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ,तेल बॉटल,उटणे आदि पदार्थ शिक्षकांनी स्वखर्चातून वाटप केले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदील,भेटकार्ड,पणती रंगकाम आदींचे प्रदर्शन भरवण्यात आले. मुलांनी बनवलेल्या वस्तू पाहून उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यासिका वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष राशिनकर पाटील उपसरपंच सौ.पुष्पाताई बापूसाहेब लांडे,ज्येष्ठ नागरिक संपत लांडे,बापूसाहेब लांडे,सुर्यकांत लांडे,दिगंबर लांडे आणि सर्व विद्यार्थी व शिक्षक आदी उपस्थित होते.शेवटी सुजाता सोळसे यांनी सर्वांचे आभार मानले.शिक्षकांनी सामाजिक जाणीवेतून हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष राशिनकर व सर्व पालक ग्रामस्थ,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, संजीवन दिवे,मंगल गायकवाड व केंद्रसमन्वयक वाघुजी पटारे यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page