मनसेच्या प्रयत्नाला अखेर यश,स्ट्रीट लाईट सुरु होऊन महामार्ग प्रकाशमय
नळदुर्ग प्रतिनिधी (अजित चव्हाण):-नळदुर्ग गोलाई ते बसस्थानक पर्यंत करण्यात आलेल्या महामार्गावरील दुभाजका मध्ये स्ट्रीट लाईट होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
ऑगस्ट महिन्यात 58 पोल उभे करून तपासणी हि केली होती. परंतु कागदपत्राची पूर्तता,विद्युत रोहित्र,तांत्रिक बाबी,वीज पुरवठा,आणि हस्तातर अशा अनेक बाबी मुळे लाईट सुरु होण्यासाठी विलंब लागत होता,मनसेच्या पदाधिका-यांनी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयातील अधिका-यांशी वेळोवेळी संपर्क साधत दिवाळीत लाईट सुरु होण्यासाठी प्रयत्न केले. या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी,राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सोलापूर,नगर परिषद,नळदुर्ग,महावितरण कार्यालय,नळदुर्ग, उपविभागीय महावितरण कार्यालय,तुळजापूर, विभागीय कार्यालय धाराशिव, रचना कन्स्ट्रशन, व संबंधित सर्व अधिकारी यांच्याकडे सातत्याने संपर्क साधत दिवाळीत स्ट्रीट लाईट सुरु होण्यासाठी प्रयत्न केले.
शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे व रचना कन्स्ट्रशनचे मनसेचे शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी आभार मानले आहेत. स्ट्रीट लाईट सुरु होण्यासाठी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, शहर संघटक रवि राठोड, जनहित कक्षाचे ऍड.मतीन बाडेवाले, मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण, मनविसे शहराध्यक्ष निखिल येडगे, शिरीष डुकरे, दिलीप शंकरशेट्टी,संदीप वैद्य,दिलीप राठोड आदींनी वेळोवेळी आंदोलन करत पाठपुरावा केला. महामार्ग प्रकाशमय झाल्याने शहरवासिय, वाहनधारक यांनी समाधान व्यक्त करत मनसेच्या पदाधिका-यांचे कौतुक करीत आहेत.