
संगमनेर (राजेंद्र मेढे):-पिकांच्या पेरणीपासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना २०२३ मध्ये लागू केली आहे.
केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.यात भात,खरीप ज्वारी,बाजरी,नाचणी,मूग, उडीद,तुर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा,सोयाबिन ही गळीत धान्य पीके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.त्यानुसार पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणारे नुकसानीचा पिकविम्यात समावेश आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या अवकाळी पावसाने तसेच पाऊस नसल्याने ही मोठ्या प्रमाणात नुकसान होते व त्याची भरपाई तुरळक अशा शेतकऱ्यांना मिळते.परंतु भारत सरकारने एक पीक विमा संरक्षण योजना आणून एक रुपया भरून पिक विमा आणला होता की ज्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होईल,अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील पुर्व व पच्छिम भाग सोसायटी मार्फत शेतकरी सभासदांनी एक रुपया पिक विमा काढला होता तो एडीसीसी बँकचे मॅनेजर मंडलिक तसेच गेटम व थाकतोडे ,शांताराम अरोटे,सचिन जाधव यांनी याची वेळेवर पुर्तता करून आज विम्याची पंचवीस टक्के रक्कम बँक कर्ज खात्यात जमा केली असून तसेच अजून जमा करण्याचे काम चालू आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय गोडगे यांनी बँकेचे मॅनेजर तसेच कर्मचाऱ्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.या वेळी प्रगतशील शेतकरी यमाजी गोडगे म्हणाले की यामुळे गावातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.